पालघर : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या तसेच गरोदर माता, स्तनदा माता व बालकांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस  मानधनात वाढ होईल या प्रतीक्षेत आहेत.  या संदर्भात त्यांनी विविध स्तरावर निवेदन दिले आहे.

पालघर जिल्ह्यात ३२०० अंगणवाडी सेविका आहेत.  तितक्याच संख्येमध्ये अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. या   सेविकांकडून गरोदर माता यांची नोंदणी करणे, त्यांचे लसीकरण करणे, जनजागृती करणे, आहार देणे तसेच प्रसूती घरी न होता आरोग्य केंद्रामध्ये करण्यास प्रवृत्त करणे, प्रसूती दरम्यान लागणारे साहित्य तयार करून देणे, स्तनदा मातांना मार्गदर्शन करणे, आहार पुरवठा करणे, बालकांचे लसीकरण व अनौपचारिक शिक्षणात सहभागी करुन घेणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन तसेच महिला बालकल्याण विभागाचे विविध उपRम राबविण्यास मदत करणे व इतर जबाबदारी असते.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Mobile clinic in every district of the state
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता फिरता दवाखाना!
water shortage Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता; नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट
Limited sources of water supply to cities in Thane district
ठाणे जिल्ह्यतील शहरांपुढे भविष्यातील ‘जलचिंता’

अंगणवाडी सेविकांनी करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले तसेच माता व बालकांना पोषण आहार पुरवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबियांचे सर्वेक्षण करून या कुटुंबीयांकडे शिधापत्रिकेबाबतची माहिती अद्यावत करणे व आवश्यकतेनुसार नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी अर्ज भरून घेण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या महत्वकांक्षी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. त्याना मानधन वाढ मिळावी तसेच करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागणीसाठी पालघर पंचायत समिती सदस्या व महाराष्ट्र शिवअंगणवाडी सेनेच्या उपाध्यक्ष श्वेता देसले यांनी पुढाकार घेतला आहे.

गरोदर माता, व बालकांना खाद्यपदार्थ पुरवणे आदी सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक वर्षांपासून मानधन वाढीची मागणी करीत आहे. परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.