28 September 2020

News Flash

बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने संताप

मनगुत्ती गावातील घटना; मराठी भाषिकांमध्ये संतापाची भावना

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला.  काल रात्री अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नाडीगांच्या दबावामुळे हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते. व त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून कन्नाडीगांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हा पुतळा बसवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका सीमाभागातील समाज माध्यमातून व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटक शासनाला वावडे आहे का? असा शिवप्रेमी नागरिकांमधून सवाल केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 5:41 pm

Web Title: anger over removal of statue of chhatrapati shivaji maharaj in belgaum district msr 87
Next Stories
1 चंद्रपूर : बल्लारपूर शहरात भरदिवसा गोळीबार; कोळसा व्यावसायिक सूरज बहुरियाची हत्या
2 सुशांत सिंह आत्महत्या; सीबीआय चौकशीला राज्य सरकारचा विरोध; सर्वोच्च न्यायालयाला दिली तपासाची माहिती
3 हिंगोली : कळमनुरी नगराध्यक्षांसह १२ नगरसेवका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
Just Now!
X