सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे एका प्रवासी वाहतुकीच्या जीपची धडक बसून घडलेल्या अपघातात एक बारा वर्षांचा मुलगा जागीच मरण पावला. या दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने प्रवासी वाहतुकीच्या दोन जीपगाडय़ा जाळल्या.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुंभारी येथे एका जीपने ठोकरल्यामुळे शालेय मुलगा मृत्युमुखी पडला. तेव्हा संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त जीप आग लावून पेटवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एका प्रवासी जीपला आग लावली गेली. दरम्यान, या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे.