News Flash

अनिकेत कोथळेच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची कुटुंबीयांची मागणी

अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची मागणी, आत्मदहनाचाही इशारा

संग्रहित छायाचित्र

 

अनिकेत कोथळेच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. इतकेच नाही तर या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्याससमोरच आत्मदहन करू असा इशाराही कुटुंबीयांनी दिला. रविवारी दीपक केसरकर यांनी पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यावेळी अनिकेतच्या कुटुंबीयांनी ही मागणी केली. अनिकेतला कोठडीत ठार करण्यात आले आहे हे ठाऊक असूनही काही वरिष्ठ अधिकारी माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होते. आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वासच उरलेला नाही असेही कोथळे कुटुंबाने सांगितले.

या सगळ्या प्रकरणात माहिती लपवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि लकी बॅग हाऊसच्या मालकासह मध्यस्थी करणाऱ्यांना सहआरोपी करावे, असे न केल्यास आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्महदहन करू असा इशाराच अनिकेतच्या कुटुंबीयांनी दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करू असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच अनिकेतच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल असेही केसरकर यांनी सांगितले. कोथळे कुटुंबीयांची भेट घेतल्यावर दीपक केसरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस मुख्यालयात झाडाझडती घेतली. जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांचा आढावाही घेतला. अनिकेत कोथळे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल असेही केसरकर यांनी सांगितले.

अनिकेत कोथळे याचा पोलीस मारहाण खून प्रकरणी दोषींना अटक केली आहे . तरीही वरिष्ठ पोलिस अधिकारी असलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे , अशी माहिती गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली . जे याप्रकरणी दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 10:33 pm

Web Title: aniket kothale family warn to suicide in front of police station
Next Stories
1 महावितरणच्या परीक्षेमध्ये कॉपी करणारे चार ‘कॉपीबहाद्दर’ अटकेत
2 औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचे थैमान, ५०० पेक्षा जास्त रूग्ण उपचारांसाठी रूग्णालयात
3 बीडचा तरुण जायकवाडी धरणात बुडाला
Just Now!
X