शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेंने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते. वाझेने पैसे भरण्यात असमर्थता दाखवल्यानंतर देशमुखांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे.

सचिन वाझे पुढे म्हणाले की, जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या (डीसीपी) बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब खूश नव्हते आणि त्यांनी आदेश माघारी घेतला होता.

jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
MLA vaibhav naik On kiran samant
“किरण सामंत यांना उमेदवारीसाठी राणेंची लाचारी करावी लागतेय…”; वैभव नाईक यांनी डिवचलं
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
sindhudurg district collector ordered deepak kesarkar s to deposit pistols
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा

“तीन ते चार दिवसांनंतर मला कळले की पैसे आणि इतर काही तडजोडींनंतर हा आदेश जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तर, २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे यांच्यामार्फत  अनिल परब यांना देण्यात आले होते.

अनिल देशमुख सचिन वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिथीगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत. सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणांमध्ये तर अनिल देशमुख स्वतःच निर्देश द्यायचे, असंही वाझेनी सांगितलं.

अनिल देशमुख यांनी प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे आदेश देत १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आली होती, असंही वाझेने सांगितलं. “वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७ कोटी रुपये गोळा केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी मला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोन केला आणि मला आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या. नंतर कुंदन शिंदे यांनी मला ताबडतोब फोन केला आणि मला सह्याद्रीच्या गेस्ट हाऊसच्या बाहेर भेटायला सांगितले. तिथे मी काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये आलो आणि जमा केलेल्या १.६० कोटी रुपये भरलेल्या पाच पिशव्या दिल्या,” असंही वाझेने सांगितलं.