मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे.

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने पत्रकारपरिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“महाराष्ट्र गृहमंत्री राजीनामा का देत नाहीत? आमची ही देखील मागणी आहे, हे जे वसुली रॅकेट आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी महाराष्ट्र सरकार चालवत आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काय जबाबदारी आहे? ते आतापर्यंत काही बोलले का नाही? हे भ्रष्टाचारी सरकारला एक मिनिट देखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ज्याप्रकारचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, हे म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही. एक-एक मिनिटं हे सरकार सत्तेवर राहणं लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. हे सरकार आज महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी एक धोका बनलं आहे, हे धोकादायक सरकार आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, “करोना पेक्षा जास्त धोकादायक हे खंडणी व्हायरसचं रॅकेट आहे, जे सरकार चालवतं आहे. यासाठी आम्ही मागणी करतो, कारण महाराष्ट्राच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव देखील यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हे आवश्यक आहे की, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. ती केंद्राची देखील यंत्रणा असू शकते आणि हे कोर्ट मॉनिटर्ड देखील होऊ शकतं. मात्र एका सरकारद्वारे जर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी एक वसुली रॅकेट चालवलं जाईल, तर हे कधीच महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. हे आवश्यक झालं आहे, एक मिनिटंही वाया न घालता मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, जबरदस्ती वसुली कशी होत आहे? आणि गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे.” असं देखील पत्रकारपरिषदेत सांगण्याता आलं आहे.