राज्यामधील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर असणाऱ्या अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आज न्यायालयाच्या निकालानंतर देखमुख यांनी राजीनामा दिलाय. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य देण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यालायाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी ट्विटरवरुन आपलं राजीनामा पत्र पोस्ट करत राजीनामा देत असल्याची घोषणा केलीय. त्यांनी पत्रात काय म्हटलं आहे पाहुयात….

नक्की वाचा >> देशमुखांचा राजीनामा म्हणजे आमच्या लढ्याला मिळालेलं यश; महाराष्ट्र भाजपाचा दावा

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.

“मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत,” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.