छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याविषयी स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच काही जणांनी सोशल मीडियावरून जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकावरून विनोदी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर काही जणांनी सोशल मीडियावरून जोशुआवर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. जोशुआविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,”अग्रिमा जोशुआ हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल केले होतं. त्यासंदर्भात कारवाई करण्याआधी स्थायी समितीची कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्याचबरोबर एका महिलेवर आक्षेपार्ह टीका टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. उमेश जाधव व इम्तियाज शेख यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी आक्षेपार्ह टीका व पोस्ट करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अशा सर्वांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
Action will be taken against all those who put posts or made very objectionable statements. A list of all such people are being made, Police will take action against them: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on stand-up comedian #AgrimaJoshua https://t.co/3SRRftYDqV
— ANI (@ANI) July 13, 2020
कायदेशीर सल्ल्यानंतर कारवाई…
“अग्रिम जोशुआवर कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहेत. चौकशीमध्ये अग्रिमा जोशुआ दोषी असल्याचं आढळून आल्यास तिच्यावरही कारवाई केली जाईल,” असं देशमुख म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 8:08 pm