News Flash

अंजली दमानिया यांची हजारे यांच्याशी चर्चा

खडसे यांच्याविषयी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे दमानिया यांनी हजारे यांना दाखवली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरूध्द केलेल्या तक्रारींबाबत बुधवारी दुपारी राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
खडसे यांच्याविषयी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे दमानिया यांनी हजारे यांना दाखवली. या कागदपत्रांचा मोठा गठ्ठाच त्यांनी येथे आणला होता. त्याच्या प्रती त्यांनी हजारे यांना दिल्या. त्यावर अभ्यास करण्याचे आश्वासन हजारे यांनी दिले.
विविध २० मुद्दय़ांवर त्यांची चर्चा झाल्याचे समजते. याच मुद्दय़ावर दमानिया गुरूवारपासून उपोषण सुरू करीत असून त्याचीही कल्पना त्यांनी हजारे यांना देऊन उपोषणासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
उपोषणाचा इशारा
समाजसेविका अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निश्चित कालावधीत एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाईल हे आश्वासन मिळेपर्यंत उपोषण आंदोलनाबाबत माघार घेणार नसल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 2:33 am

Web Title: anjali damania meets anna hazare
Next Stories
1 भाजप नगरसेवकांचे राजीनामा नाटय़
2 बेदाण्यावरील व्हॅट रद्द
3 ‘नमामि चंद्रभागा’साठी प्राधिकरण स्थापणार
Just Now!
X