News Flash

आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत : मेधा पाटकर

आमच्या सारख्यांना संघटनेला विचारात घेऊनच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो.

संग्रहित छायाचित्र

आमच्या सारख्यांना संघटनेला विचारात घेऊनच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे अण्णांनी देखील चर्चा करूनच उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल, पण आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत, असा मला विश्वास आहे, असे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. अण्णा हजारे यांनी काल उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केल्याच्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या की, “उद्या केंद्र सरकार मार्फत जे बजेट मांडले जाणार आहे. त्यातून मोदी सरकारची खरी परीक्षा असणार आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने आम्ही निर्णय घेत आहोत अस जर म्हणत असतील. तर त्यांनी msp च्या नुसार अडीच लाख कोटीचा निधी त्यांना द्यावा लागणार आहे. तसेच स्वामीनाथन आरोग्याच्या शिफारशीवरून हमी भाव (MSP) नाही दिला जात आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगा नुसार निधी देणार का? हा प्रश्न आमच्या समोर आहे. तसेच ते हमी भाव कायदा आणणारा का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- “अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!”

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, त्यांनी खूप काही सांगितले होते. त्यातील एक म्हणजे त्यांनी 15 लाख दिलेत. त्यांनी खूप काही दिले, अशा शब्दात केंद्र सरकारावर त्यांनी निशाणा साधला. त्याच बरोबर देशात ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही. त्या राज्यांनी कृषी विधेयकास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र केव्हा असा निर्णय घेते याकडे माझ लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- APMC तील सुधारणांबाबतच्या विधानावर शरद पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

केंद्र सरकारने आम्हाला फसवले, आमचं आंदोलन असंच सुरू राहणार : मेधा पाटकर
“कृषी विधेयक कायद्या विरोधात आम्ही रामलीला मैदान मागितले होते. त्यावेळी तोंडी परवानगी दिली होती. पण दिल्लीच्या आसपासच्या बाजूला असलेल्या राज्यामधील येणार्‍या शेतकर्‍यांचा लोंढा लक्षात घेता. त्यांनी दिल्लीच्या सीमेवर सर्वांना रोखले. यामुळे आम्ही आहे त्या ठिकाणी बसून लढा देण्याचा ठरवला असून असच लढा पुढे देखील सुरूच राहणार असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले. पण एकच वाटते की, आंदोलनासाठी आम्हाला रामलीला मैदान दिले असताना अखेरच्या क्षणी परवानगी नाकारल्याने, या केंद्र सरकारने आमची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.”

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “मागील दोन महिन्याच्या कालावधीत आंदोलनाच्या ठिकाणी तब्बल 171 शेतकरी शहीद झाले असून त्यात महाराष्ट्रातील एका महिलेचा समावेश आहे. अद्याप ही शेतकरी तिथे रात्र दिवस बसून आहेत. कृषी विधेयक मागे घेण्याच्या दृष्टीने आम्ही आंदोलन करीत आहोत. त्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली येथे ट्रॅक्टर मोर्चा काढला गेला. पण त्यावेळी जी काही घटना घडली. त्याबाबत सर्व गोष्टी समोर येतील, पण त्यावर मोदी जी बोलत नाहीत” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 5:59 pm

Web Title: anna hazare could never took decision which can hamper the protest medha patkar svk 88 dmp 82
Next Stories
1 “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”
2 Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवत शिवसैनिकाने केला ओव्हरटेक; गृहमंत्र्यांपर्यंत गेलं प्रकरण
3 “अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!”
Just Now!
X