News Flash

सुरक्षा काढून घेण्याची अण्णा हजारेंची मागणी ;  मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकोरने सुरक्षा देऊन माझे मरण थांबणार नाही तर ते क धीही येणारच आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा राज्य सरकोरने निर्णय घेतलेला असताना हजारे यांनी मात्र आपली सुरक्षाच कोढून घेण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाक रे यांना शुक्रवारी पाठविले आहे.

‘आपणास देण्यात आलेल्या सुरक्षेवर मोठा खर्च होतो. जनतेचा पैसा आपल्या सुरक्षेवर खर्च होऊ नये, त्यामुळे वेदना होतात. म्हणून ही सुरक्षा कोढून टाक ण्यात यावी. माझ्या बाबतीत एखाद्या वेळी नक ो अशी घटना घडली तरी मी मुख्यमंत्र्यांना सुरक्षा काढण्यास लेखी स्वरुपात सांगितलेअसल्याने सरकोरवर क ोणतीही जबाबदारी येणार नाही. ज्यांना सुरक्षा क मी पडते अशा लोकोंना ती देण्यात यावी,’ अशी विनंती असल्याचे अण्णांनी या पत्रात म्हटले आहे.

आपल्या पत्रात हजारे पुढे म्हणतात, कोही स्वार्थी माणसं आमच्या आंदोलनामुळे दुखावली गेली आणि बारा वेळा मला माझी हत्या क रण्याच्या धमक्या आल्या. कॅनडामधूनही एक  धमकी आली. एकेकाळी राज्याचे मंत्रीपद भूषविणारे पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळक र यांच्या बरोबर अण्णा हजारे  यांची हत्या क रण्याची सुपारी दिल्याचे आरोपी परसमल जैन याने न्यायालयासमोर सांगितले. पोलिसांत तक्रार के ल्यानंतर पद्मसिंह पाटील यांना अटक  झाली. हा खटला अद्यापही सुरू आहे.

‘१९६५ मध्ये खेमक रण सीमेवर भारत-पाकि स्तान युद्धामध्ये शत्रूच्या हल्लय़ात माझे सर्व सहकोरी शहीद झाले आणि मीच वाचलो. त्या वेळीच माझी मरणाची भीती गेली असल्याने मी मरणाला व धमक्यांना घाबरलेलो नाही. नैसर्गिक आजाराने मरण्यापेक्षा समाज, राज्य आणि देशाची सेवा क रता क रता मरण आले तर ते माझे भाग्य असेल अशी माझी धारणा झालेली असल्याने मी क धीही सरकोरक डे संरक्षण मागितलेले नाही. परंतु वेळोवेळी माझी हत्या क रण्याच्या येणाऱ्या धमक्यांमुळे  सरकारने मला सुरक्षा दिली. सुरक्षा घेणे योग्य वाटले नाही म्हणून सरकोरला चार वेळा सुरक्षा कोढून घेण्यासंदर्भात पत्र लिहिली, मात्र सुरक्षा कोढली गेली नाही.’ असेही त्यांनी म्हटले आहे.

‘संरक्षणाबरोबरच शासकीय वाहनाचा  इंधनाचा खर्चही होतो. गरीब माणसाकडून वसूल के लेल्या क रातून तो करण्यात येत असल्याने आपण फिरण्यावरही मर्यादा घालून घेतल्या आहेत. आवश्यक तेशिवाय कु ठेही जात नाही असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सरकोरने सुरक्षा देऊन माझे मरण थांबणार नाही तर ते क धीही येणारच आहे. ते थांबणार असते तर स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांची हत्या होऊ शक ली नसती. उच्च दर्जाची सुरक्षा असताना त्याना मारले गेले. कोही लोकोंना मागे पुढे बंदूक धारी माणसं घेऊन चालण्यामध्ये भूषण वाटते, आपणास मात्र ते दूषण वाटते. कोमानिमित्त बाहेर जातो त्या वेळी बरोबर दिव्याची गाडी असते. गर्दीच्या ठिकाणी सायरन वाजल्यावर कोण व्यक्ती आहे म्हणून लोक  पाहतात. तेव्हा त्यांच्याक डे पाहण्याची हिंमत होत नाही. मान वर न जाता खाली जाते. त्यामुळे पुढच्या सीटवर न बसता मागच्या सीटवर मी बसतो. जेणेक रून मी  लोकोंना दिसू नये याची कोळजी घेतो,’ असे हजारे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 3:10 am

Web Title: anna hazare demand to withdraw his personal security zws 70
Next Stories
1 सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, मुस्लिम समाजाचा जनआक्रोश मोर्चा
2 दिल्लीत वजनदार आणि गल्लीत पोकळ
3 सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचाली
Just Now!
X