निंदकांकडून माझ्यावर व राळेगणसिद्धीवर केलेली टीका टिपणी व विरोधातून आपणास नवीन ऊर्जा मिळते, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांनी गुरुवारी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे सडेतोड  उत्तर दिले.

माझ्यावर टीका, निंदा तसेच विरोध करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळे मला नवीन ऊर्जा मिळत गेल्याचे नमूद करुन अण्णा पुढे म्हणतात,की यापुढेही अशीच निंदा करत राहा,जेणेकरुन मला नवी ऊर्जा मिळत राहील. आज ८२ वर्षांच्या वयातही देशातील आणि परदेशातील लोक  विशेषत: तरूण राळेगणसिद्धीला येऊन प्रेरणा घेतात. या प्रेरणेतून हे तरुण राळेगणसिद्धीएवढे करता आले नाही तरी, काही ना काही काम करायला लागतात ही बाब मला सामाजिक  दृष्टीने महत्त्वाची वाटते.

महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि पुरावे नष्ट क रण्यासाठी त्यांची होणारी हत्या हा समाज आणि देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. विशेषत: दिल्लीच्या निर्भया प्रक रणात आरोपींना २०१३ मध्येच फाशीची शिक्षा सुनावली गेली. सात वर्षांचा प्रदीर्घ कालावधी गेला,पण अद्यापही आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही. २००५ नंतर देशात ४२६ प्रकरणांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, पण कार्यवाही झाली नाही. महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि हत्येच्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा होउनही न्याय मिळण्यास विलंब होतो हा सुद्धा समाजावर अन्यायच आहे. याला जबाबदार कोण? प्राथमिक  पुरावे जमा करणारे, कायदे करणारे की न्याय व्यवस्थेतील लोक ? हा संशोधनाचा विषय आहे. हैद्राबादमध्ये पोलिसांनी घडवलेल्या चकमकी सारखे प्रकरण  आणि जनता जल्लोष करते हे बरोबर की चूक  असा सवाल हजारे यांनी केला आहे.

उपोषणाच्या वेदना त्यांना कशा कळणार ?

जनतेच्या, राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी गेल्या २५ वर्षांत २० वेळा वेगवेगळया प्रश्?नांवर  ८,१०,१५ दिवस  उपोषण आणि मौन धरले होते. त्या उपोषणाच्या वेदना टीका करणाऱ्यांना कशा कळणार? मात्र अशी माणसे आहेत, म्हणून तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत राहते असे हजारे यांनी नमूद केले.