News Flash

अण्णा हजारे यांचा ममतांना पाठिंबा

गाव केंद्रस्थानी ठेऊन विकासाची अर्थनिती बदलू शकते हा विचार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करीत असल्याने त्यांच्या पक्षाला आपण पाठिंबा देणार

| February 14, 2014 03:38 am

गाव केंद्रस्थानी ठेऊन विकासाची अर्थनिती बदलू शकते हा विचार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करीत असल्याने त्यांच्या पक्षाला आपण पाठिंबा देणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरूवारी राळेगणसिद्घी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. येत्या दि. १८ ला ममता बॅनर्जी व हजारे यांच्यात दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल रॉय, खासदार के. डी. सिंग यांनी गुरूवारी राळेगणसिद्घीत हजारे यांची भेट घेऊन तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्यासंदर्भात चर्चा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:38 am

Web Title: anna hazare to campaign for trinamool congress party proud of association
टॅग : Anna Hazare
Next Stories
1 सटाणा महाविद्यालयात रखवालदाराचा कुऱ्हाडहल्ला
2 टोल वसुली कंत्राटदारांचे विदर्भात नेत्यांशी मेतकूट
3 विकासाला गती मिळण्यासाठी रस्त्यांचे जाळे हवे -अजित पवार
Just Now!
X