स्नेहालय परिवाराच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी ल रविवारी नगरला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. येथे श्रम संस्कार शिबिर, वन महोत्सव, रक्तदान शिबिर आणि िहमतग्रामच्या दशकपूर्ती सोहळा हाणार आहे.
स्नेहालयच्या ईसळक (नगर) येथील २५ एकर क्षेत्रावरील िहमतग्राम प्रकल्पात उद्या (शनिवार) व परवा (रविवार) युवक-युवतींच्या श्रम संस्कार शिबिर होणार आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाढदिवसाचे विविध कार्यक्रम होतील. येथे वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारे यांच्या इच्छेनुसार या कार्यक्रमात कोणीही फुलांचे अथवा हार-पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नये. त्याऐवजी गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य तसेच विविध फळ झाडांची रोपे आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे. आनंदऋषी रूग्णालयाच्या सहकार्याने याच ठिकाणी रक्तदान आयोजित करण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्य़ातील यशस्वी विद्यार्थ्यांचा हजारे यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. मागील दोन दशकांपासून अण्णांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची लढाई लढणाऱ्या जळगाव येथील नरेंद्र पाटील व अन्य काही कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर गेल्या तीस वर्षांपासून हजारे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षांनंतर देशातील युवकांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराविरूध्द संघटीत प्रतिक्रिया मतदान यंत्रातून व्यक्त केली. तथापि भारताचे नव निर्माण भारतीयांच्या श्रमयोगातून होणार आहे. या संदर्भात ‘भारतनिर्माणाच्या नव्या प्रेरणा’ या विषयावर हजारे यांचे व्याख्यानही यावेळी होणार आहे. त्यांच्याच हस्ते िहमतग्राम प्रकल्पाची पायाभरणी (स्व.) प्रा. मधू दंडवते, (स्व.)सूर्यभानजी वहाडणे यांच्या उपस्थितीत झाली होती. या प्रकल्पासाठी नगरमधील बाबुशेठ भंडारी आणि चंपालाल चोपडा या परिवारांनी भूदान केले. िहमतग्रामचा दशकपूर्ती सोहळा यावेळी होईल.