औरंगाबाद जिल्ह्यात आज (गुरूवारी) सकाळी 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने, एकूण करोनाबाधितांची संख्या 1 हजार 767 झाली आहे. यापैकी 1हजार 113 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत 89 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर आता 565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढललेल्या रुग्णांमध्ये 26 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. तर, बेगमपुरा (2), लेबर कॉलनी (1), पडेगाव (1), बायजीपुरा (1),हर्सुल परिसर (1), भारतमाता नगर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), रोशन गेट (2), देवळाई चौक परिसर (1), समर्थ नगर (1), शिवशंकर कॉलनी (5), शिवाजी कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), चेतना नगर (2), एन-सात सिडको (1), एन-2विठ्ठल नगर (1),विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), बारी कॉलनी (1), हनुमान नगर, गारखेडा (1), मील कॉर्नर (1), एन चार (1), क्रांती नगर (1),विजय नगर, गारखेडा (1), एन सहा संभाजी कॉलनी (6), अयोध्या नगर (1), न्यू हनुमान नगर (1), कैलास नगर (1), अजिंक्य नगर, गारखेडा (3),एन 1,सिडको (1), सुंदर नगर, पडेगाव (1), गणेश कॉलनी (2), एन चार , समृद्धी नगर,सिडको (2), कटकट गेट, नेहरू नगर (1), आंबेडकर नगर, एन -7 (3), जय भवानी नगर (1), राजा बाजार (4), अन्य (6) या भागातील करानाबाधित रुग्ण आहेत.

आणखी वाचा- सोलापुरात ५५ नवे करोनाबाधित; रूग्णसंख्या ११३५

खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगर भागातील करोनाबाधित असलेल्या 43 वर्षीय पुरूषाचा 03 जून रोजी सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत शहारातील घाटी रुग्णालयात 70, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 18, मिनी घाटीमध्ये 01 करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 89 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.