News Flash

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी ७ करोनाबाधित

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ झाली आहे

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने ७ जणांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ झाली आहे. त्यापैकी १७ रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत, तर ७ रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील १, वैभववाडी तालुक्यात २, कुडाळ तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यात २ याप्रमाणे नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील २२ वर्षीय पुरुष, कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे सापडलेली २२ वर्षीय युवती आणि ५० वर्षीय  महिला असे तिन्ही रुग्ण हे कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे यापूर्वी आढळलेल्या करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहेत.

वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावातील ५८ वर्षीय पुरुष विरार येथून आला आहे, तर याच तालुक्यातील उंबर्डे गावातील रूग्ण पनवेल येथून आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावातील दोन रुग्ण पालघर आणि विरार येथून आले आहेत.

या सर्वाना जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून अलगीकरणात ठेवण्यात आले होते. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

दुर्गादेवी देवस्थान मंडळाचा उपक्रम

करोना महामारीमुळे सारा देश आज संकटात सापडला आहे. अनेक कंपन्या कारखाने बंद आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. हातावर पोट असणाऱ्या कुणकवळे गावातील गोरगरिबांसाठी दुर्गादेवी देवस्थान मंडळ देवदूत ठरले आहे. अनेक गोरगरिबांना सुस्थितीत आपल्या गावी सोडून १४ दिवस त्यांच्या जेवणाची उत्तम सोय करून आपल्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली आहे.

डोंबिवली ते कुणकवळे (मालवण) अशी बसची व्यवस्था करून त्यांना आपल्या गावी सोडण्याचे महत्कार्य मंडळाने केलेआहे. शिवाय त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली आहे. हा सारा खर्चाचा भार मंडळाने उचलून आपल्यातील औदार्याचे दर्शन घडवले आहे. क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर हे सर्व जण आपापल्या घरी गेले. त्यांनी या सेवेबद्दल दुर्गादेवी देवस्थान मंडळाचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 3:04 am

Web Title: another 7 corona affected in sindhudurg district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जळगावमध्ये करोनाचे २४ नवीन रुग्ण
2 ‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’
3 पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?
Just Now!
X