01 October 2020

News Flash

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका करोनाबाधिताचा मृत्यू, २३ नवे करोनाबाधित वाढले

३७५ करोनाबाधितावर उपचार सुरू; जिल्ह्यातील बाधितांची संख्या ८५६ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणखी एका करोनाबधिताची मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सहा करोना रुग्णांचे मृत्यू झाले असून. यातील दोन बाहेर जिल्हातील आहे. मागील २४ तासात २३ बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या ८५६ झाली आहे. आतापर्यंत ४७५ बाधित बरे झाले आहे. तर ३७५ बाधितावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत करोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण सहा आहे. यामध्ये चार रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर अन्य दोघांचा चंद्रपूर येथे वैद्यकीय उपचार घेताना मृत्यू झाला. अन्य ठिकाणच्या दोन मृत्यू मध्ये तेलंगण व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. यातील एक महिला तेलंगण येथील होती. तर दुसरा ६० वर्षीय कामगार हा बुलडाणा येथील होता. बल्लारपूर येथे काझीपेठ एक्सप्रेसने आला होता. त्यामुळे त्यांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नाही.

जिल्ह्यात आज ९ ऑगस्ट रोजी मृत्युमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील होती. यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी दुर्गापूर येथील ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी जयराज नगर येथील ७२ वर्षीय महिला नागपूर येथे उपचारा दरम्यान २ ऑगस्ट रोजी मृत्युमुखी पडली होती. तर एक ऑगस्ट रोजी रहमत नगर येथील ४२ वर्षीय युवकाचा करोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला होता. याप्रमाणे जिल्ह्यातील रहिवासी असणारे आतापर्यंत चार मृत्यू झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 10:12 pm

Web Title: another corona patient dies in chandrapur district msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 दिलासादायक : राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त
2 छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत बसवणार!
3 अलिबाग – मुंबई बोट रुग्णवाहिका सुरु होणार
Just Now!
X