News Flash

भंडाऱयामध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भंडाऱयामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.

| February 23, 2013 11:29 am

भंडाऱयामध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भंडाऱयामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. १४ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाने शाळेच्या आवारातच दोन दिवसांपूर्वी बलात्कार केला.
लाखंदूर तालुक्यातील गोलाटी गावातील शाळेमध्ये यादव बोरकर नावाच्या शिक्षकाने हे लज्जास्पद कृत्य केले. याप्रकरणी शुक्रवारी उशीरा तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर यादव स्वतः पोलिसांपुढे हजर झाला. त्याला लगेचच अटक करण्यात आली. १४ फेब्रुवारीलाच ६, ९ आणि ११ वर्षांच्या तीन मुली मुरवाडी गावातून गायब झाल्याचे आढळून आले. या मुलींवर बलात्कार झाल्याचे आणि त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे तपासात आढळून आले होते. पोलिसांनी अजून याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.
(छायाचित्र संग्रहित असून, घटनेचा त्याच्य़ाशी संबंध नाही) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2013 11:29 am

Web Title: another rape case involving minor victim in bhandara
टॅग : Bhandara
Next Stories
1 मंगला एक्स्प्रेस घसरल्याने कोकण रेल्वे विस्कळीत
2 ‘लवासा’ आणणाऱ्यांचा माज उतरवा -राज
3 एक प्रयोग अयशस्वी, एक प्रायोगिक!
Just Now!
X