लाच मागणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘ऑडिओ बग’ नावाचे नवीन उपकरण आणले आहे. हे उपकरण एका अर्थाने पंचाचेच काम करणार आहे. हे उपकरण तक्रारदाराच्या खिशात राहील. त्यात लाच मागणाऱ्याचा संवाद टिपला जाणार आहे. ‘ऑडिओ बग’ नावाचे हे उपकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तक्रारदाराच्या खिशात ठेवून लाच मागणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी संवाद साधायला देईल. मोबाईलपेक्षाही लहान असणाऱ्या उपकरणात सिम असेल. हा संवाद थेट अधिकाऱ्यांना ऐकू येईल अशी त्यात सुविधा आहे.
या उपकरणाचा लाचलुचपतने एका प्रकरणात नुकताच उपयोग केला आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सर्वसामान्य व्यक्तीकडे लाच मागतो, तशी तक्रार ती व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देते. त्यानंतर एसीबी तक्रारदारासोबत एक पंच पाठवून खात्री करते, पण त्यानंतर संशयाने अनेकजण सापळ्यातून सुटतात. शासकीय कार्यालयात कामासाठी गेल्यानंतर अनेकदा काही अधिकारी, कर्मचारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागतात. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर पथक सापळा रचून लाचखोराला पकडतात. पण ज्यावेळी तक्रारदार तक्रार घेऊन येतो त्यावेळी एसीबीचे पथक थेट सापळा रचून कारवाई करत नाही. प्रथम खात्री करतात आणि नंतर सापळा रचतात. एसीबीच्या जाळ्यात एखादा निरपराध सापडेल म्हणून तक्रारदारासोबत पंच पाठवून खात्री केली जाते. पंचासमक्ष रकमेसंदर्भात बोलणी केली जाते. मात्र यापुढे पंचासोबतच पडताळणी करण्यासाठी एसीबीजवळ ऑडिओ बग नावाचे उपकरण राहणार आहे. हे उपकरण पंचाचे काम त्या ठिकाणी करणार आहे.
या उपकरणामुळे तक्रारदार आणि लाचेची मागणी करणारा यांच्यातील संवाद एसीबीच्या अधिकाऱ्यांना ऐकता येणार आहे. या सोबतच सापळा रचल्यानंतर न्यायालयात पुरावा म्हणूनसुद्धा ऑडिओ बगचा उपयोग होऊ शकतो. या उपकरणात असणाऱ्या सिममुळे मोबाईल नेटवर्कमध्येच साधलेला संवाद एसीबीला कळणार आहे. ऑडिओ बगचा आकार मोबाईलपेक्षा लहान आहे. त्यामध्ये एक सिमकार्ड टाकले जाईल. हे सिमकार्ड ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क आहे त्या ठिाकाणी काम करेल. ऑडिओ बगमध्ये सिमकार्ड टाकून ते तक्रारदाराच्या खिशात ठेवले जाईल. तक्रारदार लाच मागणाऱ्यासोबत संवाद साधेल त्यावेळी कार्यालयात बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांना तो संवाद ऐकता येईल. तक्रारदाराशिवाय इतर कोणालाही ऑडिओ बगची माहिती नसेल. ही गुप्तता राखली जाणार आहे.
किंवा कर्मचारी धास्तावतील असे बोलले जात आहे.