News Flash

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांचं थर्मल स्क्रिनिंग होणार; एकनाथ शिंदेंचे आदेश

बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईतील पाच बाजार पेठेतील सर्व व्यापारी,कर्मचारी यांचं थर्मल स्क्रिनिंग करावी, असे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. बंद असलेला फळ आणि धान्य बाजार सुरू व्हावा यासाठी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी, माथाडी आणि बाजार समिती संचालक यांची एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मार्केट सुरू करण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीला कोकण विभाग आयुक्त शिवजीराव दौंड, खासदार राजन विचारे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण, सर्व बाजारपेठेचे संचालक, व्यापारी आणि माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबईतील पाच बाजार पेठेतील सर्व व्यापारी, कर्मचारी यांचं थर्मल स्क्रिनिंग करावं, अशे आदेश एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. तसंच या थर्मल स्क्रिनिंगमध्ये जे कोणी संशयित आढळतील त्यांची करोनाची चाचणी घेण्यात यावी, तसंच आवश्यक वाटेल त्या व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात यावं, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शासनाच्या आदेशानंतर करोनाचे सावट असताना बुधवारपासून पुन्हा एकदा एपीएमसीतील कांदा बटाटा व भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने आवश्यक गाडय़ांनाच एपीएमसीत प्रवेश देण्यात येणार असून या पाचही बाजारांवर ड्रोन कॅमेरा नजर ठेवणार आहे.

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती असून या ठिकाणाहून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना शेतमाल पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या आठवड्यात येथील मसाला बाजारामधील मुंबईत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला करोनाचा संसर्ग झाला. त्याचप्रमाणे या बाजारांत मुंबईतून मोठ्या प्रमाणात खरेदीदार येत असल्याने करोना संसर्गाचा धोका वाढल्याने आणि व्यापारी व माथाडींनी बाजारसमिती बंदची मागणी लावून धरल्याने बाजार बंद करण्यात आली. मात्र टाळेबंदी कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने शासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवत बाजार सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारपासून कांदा-बटाटा व भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. बुधवारी भाजीपाल्याच्या १९१ तर कांदा-बटाटाच्या १३५ गाड्यांची आवक झाली.

या ठिकाणी शेतमाल खरदेसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. यामुळे करोना संसर्गाचा धोका असल्याने बाजारात मर्यादित गाडय़ांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 3:42 pm

Web Title: apmc market navi mumbai thermal screening will be done workers other staff eknath shinde orders coronavirus jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला; म्हणाले…
2 देवेंद्रजी, ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; फडणवीसांना अशोक चव्हाण यांचं उत्तर
3 महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पार, एकाच दिवशी वाढले १६५ पॉझिटिव्ह रुग्ण
Just Now!
X