सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील उत्कृष्ट पक्षी निरीक्षकाची निवड येत्या १० जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्या पक्षी निरीक्षकाला २३ व २४ जानेवारी रोजी सावंतवाडीत होणाऱ्या राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे. वाइल्ड कोकण, निसर्गप्रेमी मंडळ आणि नगर परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या २९व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील उत्कृष्ट पक्षी निरीक्षकाची निवड केली जाणार आहे.

या निवड झालेल्या पक्षी निरीक्षकास विनोद गाडगीळ स्मृती प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने दिगंबर गाडगीळ यांच्याकडून एक हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन संमेलनात गौरविण्यात येणार आहे. २९वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन २३ व २४ जानेवारी रोजी सावंतवाडीत नाथ पै सभागृहात होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक व पक्षी संशोधकांनी येत्या रविवार, १० जानेवारी रोजी सावंतवाडी नगरपालिका बॅ. नाथ पै सभागृहातील ब्रिज कक्षात सकाळी १० वाजता उपस्थित राहावे. या वेळी आपला बायोडाटा, फोटो, पक्षी निरीक्षणाची नोंदवही आदी घेऊन उपस्थित राहावे.

सिंधुदुर्गातील उद्योन्मुख पक्षी निरीक्षकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन वाइल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांनी केले आहे. या स्पर्धेत वयाची अट नाही. त्यामुळे पक्षी निरीक्षकांना सहभाग घेता येईल. या अधिक माहितीसाठी ९४२०२०९०१३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे वाइल्ड कोकणचे सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी आवाहन केले आहे.