02 December 2020

News Flash

गोरोबाकाकांच्या पुरातन वास्तूचा खांब निखळला

पुरातत्त्व खात्याच्या कामावर प्रश्नचिन्ह

तेर येथे संत गोरोबाकाकांच्या घराचे काम पुरातत्त्व विभागाने एक कोटी रुपये खर्चून केले होते. मात्र त्याचे खांब आता निखळू लागले आहेत.

वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या घराचा जीर्णोद्धार करून नव्याने हुबेहूब तसेच माळवदाचे घर उभारण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने एक कोटींचा निधी खर्च केला आहे. बांधकामाला चार वर्षे होण्याआधीच कामाचा दर्जा सर्वांसमोर येऊ लागला आहे.  रविवारी माळवदाचा एक खांब निसटून पडला आहे.

बाराव्या शतकातील तेर येथील संतश्रेष्ठ संत गोरोबाकाका यांचे घर पाहण्यासाठी पर्यटक, भाविक मोठय़ा प्रमाणात येतात. गोरोबाकाकांच्या घराची दूरवस्था झाली होती. त्यामुळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने घराच्या बांधकामास सन २०१२-१३ मध्ये २५ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला. भिंतीवरील मातीचा लावलेला लेपही ढासळत असल्याने तसेच पावसाळ्यात माळवदाला गळती लागत होती. त्यामुळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने सन २०१५-१६ मध्ये पुन्हा ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर घरांचे बांधकाम नव्याने करण्यात आले.

घराचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षांंचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंतच घराच्या माळवदास बसविण्यात आलेल्या  सागवानास वाळवी लागल्याने माळवदाचे सागवानी खांब कोसळण्यास सुरुवात झाली.   निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:19 am

Web Title: archaeological department spent rs 1 crore to remove the roof and the pillars abn 97
Next Stories
1 रायगड जिल्ह्य़ात औधष निर्माण प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध?
2 पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रकल्पांना गती?
3 आर्थिक सहाय्याच्या मागणीसाठी मंडप, केटर्स असोसिएशनचे धरणे
Just Now!
X