News Flash

साताऱ्यात सशस्त्र टोळक्याचा भररस्त्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न

वाहनचालकांकडे केली पैशांची मागणी

संग्रहित छायाचित्र

सातारा शहरात खेड नाका ते बाँम्बे रेस्तराँ चौकादरम्यान एका टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावर गोंधळ घालत गाड्यांची तोडफोड  करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. भर दुपारी रस्त्यात दुचाकी व मोटार चालकांना कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

पुणे-बंगळूरू महामार्गालगत असणाऱ्या खेडनाका ते बाँम्बे रेस्तराँ चौकादरम्यानच्या परिसरात काही तरुणांच्या टोळक्याने शुक्रवारी धुडगूस घातला. हातात कोयते नाचवत दोन दुचाकी व मोटारी अडवत पैशांची मागणी करीत त्यांनी तोडफोड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुपारी ४-५ च्या दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आणखी वाचा- ‘फेकुताई’ म्हटल्याने नगरसेविकाला राग अनावर, तरुणासह कुटुंबावर सशस्त्र हल्ला

हा परिसर रहदारीचा व नवीन वसाहतींचा असल्याने वाहन चालक व नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा होती. ही बाब सातारा शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधितांबाबत स्थानिकांकडून माहिती घेत गोंधळ करणाऱ्यांची शोध मोहीम चालू केली. दरम्यान, नागरिकांनी परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 9:00 am

Web Title: armed gangs to terrorize people of satara in day time aau 85
Next Stories
1 यवतमाळ शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल
2 GOOD NEWS : राज्यातील ‘हा’ जिल्हा झाला करोनामुक्त
3 करोनाने चिंता वाढवली, उद्धव ठाकरेंसोबत पंतप्रधान मोदी साधणार संवाद; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
Just Now!
X