16 January 2021

News Flash

ही पाहा अन्वय नाईक यांची Suicide Note; काँग्रेसचे ट्विट

या चिठ्ठीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करावं असा प्रयत्न फडणवीस सरकारने केल्याचा आरोप

‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करताना काँग्रेसने या प्रकरणावरुन भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे. फडणवीस सरकारने सोयीस्करपणे या प्रकरणाकडे दूर्लक्ष केल्याचे आरोप करत काँग्रेसने अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीच समोर आणली आहे.

नक्की वाचा >> अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो पोस्ट केला आहे. “अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी पोलिसांच्या नजरेतून सुटावी यासाठी फडणवीस सरकारने प्रयत्न केले. हे खूपच लज्जास्पद आहे,” अशी कॅप्शन सचिन सावंत यांनी हा फोटो शेअर करताना दिली आहे.

सावंत यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्णब गोस्वामीसह आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा यांच्या नावांचा उल्लेख असलेली आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये या तिघांनाही आमच्या मृत्यूसाठी जबाबदार धरावे असा उल्लेख आहे.

दरम्यान यापूर्वीच पोलिसांनी अर्णब यांना ताब्यात घेतल्याच्या कारवाईचे समर्थन करताना काँग्रेसने या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण गुन्हेगारीशी संबंधित आहे. रायगड-अलिबाग पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तराचे पत्रही सावंत यांनी ट्विट केलं आहे.

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलिसांनी पाठवलेल्या पत्राचा फोटो सावंत यांनी ट्विट करत, “यावरुन अर्णब गोस्वामींविरोधात करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आहे हे स्पष्ट होत आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या प्रकरणाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये नाव असल्याने या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी मात्र फडणवीस सरकारने ती होऊ दिली नाही,” असं म्हटलं आहे.

सावंत यांनी ट्विट केलेलं पत्र १५ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आल्याचे त्यावरील तारखेवरुन स्पष्ट होत आहे. या पत्रामध्ये पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती रायगड-अलिबागमधील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जे. ए. शेख यांनी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 3:59 pm

Web Title: arnab goswami arrest congress leader tweeted anvay naik suicide note scsg 91
Next Stories
1 पोलिसांनी मला मारलं -अर्णब गोस्वामी
2 “पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं,” अर्णब गोस्वामींना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांचा आरोप
3 “भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे”
Just Now!
X