06 March 2021

News Flash

‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या ‘त्या’ नेत्यांनी सांगावं; रोहित पवारांचा सवाल

अर्णबच्या चॅटचा स्क्रीनशॉट केला होता ट्विट...

संग्रहित छायाचित्र

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करून टीका केली होती. मात्र, अर्णब यांचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर भाजपानं या प्रकरणावर गुळणी धरली असून, रोहित पवारांनी वर्मावरच बोट ठेवलं आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आणि बोलणाऱ्या भाजपा नेत्यांना रोहित पवार यांनी सवाल केला आहे. त्याचबरोबर अर्णब गोस्वामी यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करणार की, पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Video : अर्णब व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण… राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

काय म्हणाले रोहित पवार?

“लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपाच्या त्या नेत्यांनी सांगावं. फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’,” असा सवाल रोहित पवारांनी भाजपा नेत्यांना केला आहे.

आणखी वाचा- अर्णबच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा – काँग्रेसची मागणी

अर्णबच्या चॅटचा स्क्रीनशॉट केला होता ट्विट…

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट असलेला स्क्रीनशॉट ट्विट करत चिंता व्यक्त केली होती. “कथित पत्रकाराला भाजपाच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपाच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे,” असं रोहित पवार म्हणाले होते.

आणखी वाचा- मी तेव्हाच बोललो होतो, मोदी सरकारनं निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला – पाक पंतप्रधान

अर्णब गोस्वामी- दासगुप्ता यांच्यातील संवाद?

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:12 pm

Web Title: arnab goswami partho dasgupta whatsapp chat rohit pawar slam bjp leaders bmh 90
Next Stories
1 ग्रामपंचायत निवडणूक निकाल: आपण अग्रस्थानी असल्याचा भाजपाचा दावा
2 ग्रामपंचायत निवडणूक निकाल: शिवसेनेनं मारलं मैदान, भाजपा दुसऱ्या क्रमांकावर
3 “नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेचा भाजपाला इशारा
Just Now!
X