News Flash

‘भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला अटक करा’

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची मागणी

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला त्वरित अटक करा अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. संत भगवानबाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न अत्यंत निषेधार्ह आणि भावना दुखावणारा आहे. हे कृत्य करणाऱ्या माथेफिरुला अटक करा अन्यथा परिणाम वाईट होतील असा इशाराच मुंडे यांनी दिला.

संत भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना झाली. या प्रकरणी जो माथेफिरू कोण आहे त्याचीही ओळख पटलेली आहे तरीही त्याला बेड्या का ठोकल्या जात नाहीत? पोलीस आता नेमकी कशाची वाट पाहात आहे ते समजत नाही असेही मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी सरकार आणि गृह विभागाचीच आहे. माझ्याप्रमाणेच संत भगवानबाबांवर श्रद्धा ठेवणार्या सर्व जाती धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असेही मुंडे यांनी म्हटले आहे. संत भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न नगरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात असून मंगळवारी बीड बंदचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 6:52 pm

Web Title: arrest the person who has tried to break bhagvanbaba murti says dhananjay munde
Next Stories
1 मालिकांमध्ये गुंतवणुकीचे आमिष; सिनेदिग्दर्शकाला दोन कोटींचा गंडा
2 आईच्या चिते जवळच मुलाची पेटवून घेऊन आत्महत्या
3 शिवसेना म्हणजे ‘आम्ही नाही त्यातले अन्..’, जयंत पाटील यांची टीका
Just Now!
X