News Flash

अश्लील चित्रफितींमार्फत पैसे कमवणाऱ्यास अटक

नोकरीच्या बहाण्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे उघड

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

चांगली नोकरी मिळवून देण्याचा बहाण्याने अनेक महिलांशी बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याच्या चित्रफिती एका अश्लील संकेतस्थळावर अपलोड करून त्याद्वारे पैसे कमविणारा आरोपी बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या हाताला लागला आहे.

मिलिंद अनिल झाडे असे आरोपीचे नाव असून त्याने ही कृत्ये केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपी झाडे हा मुंबईत बसवाहक म्हणून काम करत होता असे समजते. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याने एका अश्लील दृकश्राव्य संकेतस्थळावर शिव वैशाली या नावाने खाते तयार केले होते. त्यावर त्याने अनेक चित्रफिती टाकल्या आहेत. त्यातून शेकडो डॉलर्सची कमाई केल्याचेही कळते. पैसे कमविण्याच्या नादात  महिलांना नोकरीची आमिषे दाखवत महिलांना त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे.  यातील लैंगिक छळ झालेल्या काही पीडितांच्या नातेवाईकांना हे समजल्यानंतर त्यांनी या आरोपीविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. पीडित मुलींपैकी एक जण एका पिझ्झा स्टोअरमध्ये काम करीत असताना झाडेने तिला चांगली नोकरी मिळण्याचे आश्वासन दिले होते. दुसरा ही त्याचीच नातेवाईक होती असे पोलिसांनी सांगितले.  विक्रमगड आणि वालीव पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा प्रत्येकी एक गुन्हा झाडेविरुद्ध दाखल आहे. नोव्हेंबर २०१९ ते जून या काळात झाडे याने एका ३० वर्षीय महिलेवर अनेकदा अत्याचार केल्याचे  उघड  झाले आहे. या महिलेने  सप्टेंबरमध्ये वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आरोपी झाडे हा कामासाठी  सतत आपले स्थान बदलत राहिल्याने तो पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तो आपल्या पाचमाड येथील घरी आला असल्याची पक्की माहिती मिळाली होती. तेथे जाऊन त्याला अटक केली. पुढील चौकशीसाठी झाडे याला विक्रमगड पोलीस ठाण्यात सोपविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:09 am

Web Title: arrested for making money through pornographic videos abn 97
Next Stories
1 शहरात करोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला
2 पतीने टक्कल लपवल्याची तक्रार
3 वर्ध्यात मास्क न वापरणाऱ्यांचे वाहन होणार जप्त
Just Now!
X