News Flash

बिबटय़ाच्या कातडीची विक्री करणाऱ्यास अटक

१० लाख रुपये किमतीचे कातडे जप्त करण्यात आले आहे. 

बिबटय़ाच्या कातडी विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना नवघर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

मीरा रोडमधील गोल्डन नेस्ट चौकात बिबटय़ाच्या कातडीची विक्री करण्याकरिता दोन इसम सिल्वासावरून येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नवघर पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना अटक केली. अंकुश थोरात आणि रवींद्र पटेल अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडे बिबटय़ाचे कातडे आढळून आले. या कातडय़ाची किंमत १० लाख रुपये आहे. ही कातडी तपासणी करण्याकरिता वन विभागाकडे पाठवली आहे. हे कातडे कुठून आणले आणि कुणाला विकण्यासाठी आले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:15 am

Web Title: arrested for selling leather akp 94
Next Stories
1 कौशल्य विकास विभागाची ऑनलाइन फसवणूक!
2 अकोल्यात मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार
3 रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी आज
Just Now!
X