News Flash

सुसाईड बॉम्बर असल्याचे सांगत बॅंकेला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

५५ लाख रुपये न दिल्यास स्वतःसोबत बॅंकेला उडवून देण्याची दिली होती धमकी

बँकेत आल्यावर बॉम्ब अॅक्टीव्ह केला आहे असे त्या आरोपीने सांगितले

महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्याती बॅंकेत सुसाईड बॉम्बर आहोत असे म्हणत एक व्यक्ती शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर त्या व्यक्तीने बॅंकेतील कर्मचाऱ्याला एक पत्र देत पैश्यांची मागणी केली. त्या पत्रात १५ मिनिटांत ५५ लाख रुपये न दिल्यास स्वतःसोबत बॅंकेला उडवून देऊ अशी धमकी लिहिली होती. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या चपळाईने आरोपीला अटक करण्यात आली सत्य समोर आलं.

नेमकं काय घडलं

वर्ध्यातील सेवाग्राम पोलीस ठाण्यासमोर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तोंडाला कापड गुंडाळलेली एक व्यक्ती शिरली. त्यानंतर त्याने शिपायाच्या डोक्यावर बंदूक ठेवत  त्याच्या हातात एक पत्र दिलं. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिलं. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यात आजारावील उपचारासाठी ५५ लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत आल्यावर बॉम्ब अ‍ॅक्टीव्ह केला आहे. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलवले तर सर्वांना उडवून देईल, अशी धमकी त्या पत्रात होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी केली अटक

बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मिळताच तातडीने पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केलं. हा बनावट बॉम्ब बनवण्यासाठी त्या व्यक्तीने डिजीटल वॉच, पीओपी भरलेले प्लास्टिक पाईप यांचा वापर केला होता.

दरम्यान, आरोपीने पिस्तूल ऑनलाईन मागवले असल्याची माहिती दिली. योगेश कुबडे असं आरोपीचं आहे. योगेशचा सायबर कॅफे असून त्यावरील कर्जाच परतफेड करण्यासाठी नैराश्यातून हा प्रकार केला, अशी माहिती त्याने पोलिसांना तपासादरम्यान दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:21 pm

Web Title: arrested for threatening to blow up a bank claiming to be a suicide bomber abn 97
टॅग : Banking,Bomb Blast
Next Stories
1 “आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…”, रायगडावरून संभाजीराजे भोसले कडाडले!
2 “काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ दिला जाईल”
3 ताडोबा बफर क्षेत्रात वाघिणीचा मृत्यू
Just Now!
X