News Flash

उपसरपंच निवडीवेळी झालेल्या हत्येप्रकरणी दहा जणांना अटक

हत्येप्रकरणी बोरगावसह अन्य गावांतील ३८ आणि अनोळखी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहीत

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावमध्ये उपसरपंच निवडीवेळी झालेल्या हत्येप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या दहाही जणांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी शुक्रवारी दिली. या हत्येप्रकरणी बोरगावसह अन्य गावांतील ३८ आणि अनोळखी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपसरपंच निवडीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला. तर गणपती पाटील, अण्णा  माने, वसंत पाटील व श्रीकांत पाटील हे जखमी झाले होते. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, नितीन पाटील, नामदेव पाटील, सुजित पाटील, अनिल शिंदे, संतोष पाटील आदी ३८ जणांसह २० ते २५ अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करून दशरथ पाटील, किसन शिंदे, नंदकुमार पाटील, सुजित पाटील, नामदेव पाटील या बोरगावमधील आणि मणेराजुरी येथील नितीन पाटील, योगेश पवार आदींसह दहा जणांना अटक केली असून त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कवठेमहांकाळ येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, हल्ल्यात मृत्यू झालेल्या पांडुरंग काळे याच्या पार्थिवावर आज अत्यंत तणावात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात अद्याप पोलीस बंदोबस्त तनात ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:10 am

Web Title: arrested in murder case during the election of deputy sarpanch abn 97
Next Stories
1 रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवत १६ लाखांचा गंडा; राज्यात मोठं रॅकेट असल्याची शक्यता
2 अंबानी प्रकरण: कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाची ‘ती’ व्यक्ती कोण?
3 अंबानी प्रकरण: मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Just Now!
X