अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी ऊर्फ डॅडीने कुटुंबाला भेटण्यासाठी २८ दिवसांची संचित रजा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कारागृह विभागाला नोटीस बजावली.

अरुण गवळी सध्या एका शिवसेना नगरसेवकाच्या खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. उपराजधानीत दाखल झाल्यापासून त्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशाप्रसंगी वेळोवळी कधी संचित रजा, तर कधी अभिवचन रजा घेतली आहे. आता त्याने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन परिवाराला भेटण्याकरिता २८ दिवसांची संचित रजा मिळावी, अशी विनंती केली आहे. गवळीतर्फे अॅगड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, असा अर्ज विभागीय आयुक्तांकडे केला होता. परंतु, अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.