News Flash

“राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान आणि राजा बदलतात. पण…”; अरविंद जगताप संतापले

'आज के शिवाजी नेरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादावर अरविंद जगताप यांची प्रतिक्रिया

अरविंद जगताप यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या पुस्तकावरुन भाजपावर टीकेची झोड उठली आहे. विरोधीपक्षांबरोबरच अनेकांनी सोशल मिडियावरुन ‘आज के शिवाजी नेरेंद्र मोदी’ या मथळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम लेखक अरविंद जगताप यांनीही फेसबुकवरुन यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवला आहे.

काय म्हणाले अरविंद जगताप?

अनेकदा समाजामधील घडामोडींवर अगदी मार्मिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या अरविंद जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. अनेकजण सत्ता बदलल्यानंतर आपला ईमान बदलतात असा टोला अरविंद यांनी लगावला आहे. “राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात. आपला राजा बदलतात. पण मावळ्यांचे राजे नेहमी एकच असतात. छत्रपती शिवाजी महाराज. आजपण, ऊद्यापण, कधीपण,” असं अरविंद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात भाजपाचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या शिर्षकावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी याबद्दल ट्विटवरुन आपला आक्षेप नोंदवला आहे. नवी दिल्लीमधील भाजपा कार्यालयामध्ये या पुस्तकाचे प्रकाश झाले. मात्र या पुस्तक प्रकशाननंतर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनाही “ही तुलना पटत नसल्याचे सांगत तुलना करणाऱ्यांचे डोके फिरले आहे,” असा टोला लागावला आहे. याच प्रकरणावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि संभाजी राजे यांच्यामध्ये ट्विटवरुन शाब्दिक वाद झाल्याचेही पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 8:28 am

Web Title: arvind jagtap slams politics over chatrapati shivaji maharaj scsg 91
Next Stories
1 ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवायचा, मग लष्कराला आदेश द्या; मोदींना सेनेचं आव्हान
2 छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांचं उत्तर, म्हणाले…
3 लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार
Just Now!
X