News Flash

आशापुरा प्रकरणात आता मच्छीमारीलाही फटका

केळशी, उंबरशेत, रोवले येथे आशापुरा मायिनग कंपनीकडून होणाऱ्या खनिज उत्खनन व वाहतुकीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले आहे.

प्रदूषणकारी आशापुरा मायिनग कंपनीविरोधात शासकीय कारवाई सुरू असताना स्थानिक शेतकरी- बागायतदारांबरोबर आता मच्छीमारांनीही कंपनीसमर्थकांशी असहकाराची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांप्रमाणेच बोटमालकही आता अडचणीत सापडले आहेत.
केळशी, उंबरशेत, रोवले येथे आशापुरा मायिनग कंपनीकडून होणाऱ्या खनिज उत्खनन व वाहतुकीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले आहे. याबाबत भाजप नेते केदार साठे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी-बागायतदारांनी आंदोलनाचा बडगा उगारल्यानंतर प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनी कंपनी बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेकडो डम्परचालक-मालकांनी बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून दापोलीत मोर्चा काढून तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी अद्याप प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू असून कंपनीवर टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, आशापुरा मायिनग कंपनीने समुद्रमाग्रे मालवाहतूक सुरू करताना स्थानिक बोटमालकांना विश्वासात घेतले होते. त्यामुळे केळशी येथे होणाऱ्या मच्छीमारी व्यवसायात अडथळे आले नाहीत. साहजिकच बोटमालकांनी कंपनीला विरोध करण्याचे वेळोवेळी टाळले आहे. मात्र आता प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून स्थानिक शेतकरी-बागायतदार एकत्र आल्यानंतर मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या मच्छीमारांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे कंपनीला विरोध न करता एका अर्थी त्यांचे समर्थन करणाऱ्या बोटमालकांशी असहकाराची भूमिका मच्छीमारांनी घेतली आहे. त्यामुळे केळशीतील मच्छीमारी व्यवसायावर संकट आले आहे.
केळशी समुद्रकिनाऱ्यानजीक या कालावधीत कोलिंब मोठय़ा प्रमाणात मिळतो. मात्र मच्छीमारांअभावी बोटी किनाऱ्यावरच अडकून पडल्या आहेत. परिणामी केळशी बंदरात कोलिंबमुळे होणारी आíथक उलाढाल थंडावली आहे. यामुळे कर्ज काढून बोटी घेतलेल्या बोटमालकांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिंता व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 12:06 am

Web Title: ashapura case effect on fishing
Next Stories
1 ‘नगर पक्षी’साठी सावंतवाडीत मतदान
2 धुळे महापालिकेच्या कार्यशैलीविरोधात दुकाने बंद
3 ठिबकद्वारे पिकातील तणांचे प्रभावी नियंत्रण
Just Now!
X