चंद्रपूर :   सर्वत्र गाजत असलेल्या अजय देवगण व काजोल अभिनित ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातील कलावंतांना आशीष पाथोडे याने भाषा व अभिनयाचे धडे दिले आहेत. आशीषचा नागभीड तालुक्यातील बोथली या छोटय़ाशा गावातून थेट बॉलीवूडपर्यंतचा प्रवास रंजक व तितकाच खरतड आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंभर कोटींच्या वर व्यवसाय करणाऱ्या ‘तानाजी’ चित्रपटात उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान व शरद केळकर याने शिवरायांची भूमिका साकारली आहे. या कलावंतांची सर्वत्र चर्चा होत आहे. या मातब्बर अभिनेत्यांना भाषा आणि अभिनयाचे धडे आशीष पाथोडे याने दिले आहे. मराठीच्या ऐतिहासिक बोलीचा व भाषेचा अभ्यास करून पल्लेदार वाक्यांचा हिंदीतील उच्चार, सहअभिनय शब्दफेक शिकवण्यासाठी त्याने प्रचंड परिश्रम घेतले. सोबतच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांतील अनेक खुबींचे सूक्ष्मावलोकन करून ते अभिनयात उतरवण्याची जबाबदारी आशीषवर होती. ती त्याने यशस्वीपणे पार पाडली . विविध संदर्भग्रंथांचा आधार घेऊन ऐतिहासिक व्यक्तिरेखांची निरीक्षणे करून त्या त्या कलावंतामधून अभिव्यक्ती करून घेण्याची अवघड कामगिरी केली. आशीषने लीलया पेलली.  आपण कुठे जन्माला आलो? आईवडील किती शिकलेले आहेत?  कोणी गॉडफादर आहे की नाही? अशा प्रश्नांच्या गुंत्यात न अडकता त्याने यशाचा मार्ग चोखाळला आहे. कलाप्रतिभा, योग्य वेळी योग्य तोच निर्णय, परिश्रमाने उत्तुंग यशाचे शिखर गाठता येते हे आशीषने कामाद्वारे दाखवून दिले आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांपासून या क्षेत्रात टिकून असून त्याने चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. नाटक व अभिनयात आवड असणारा आशीष थेट पदवी शिक्षणासाठी पुणे विद्यापीठाच्या ललितकला विभागात नाटय़शास्त्राचे धडे गिरवण्यासाठी पोहचला. तिथे पहिले तीन वर्षे ‘कमवा व शिका’ उपक्रमात काम करीत त्याने शिक्षण घेतले. नंतर  आशिया खंडातील अभिनयाचे व दिग्दर्शनाचे प्रशिक्षण देणारी भारत सरकार संचालित एकमेव राष्ट्रीय नाटय़ शाळामध्ये पूर्ण माहाराष्ट्रातून त्यालाच प्रवेश मिळाला. यानंतर खऱ्या अर्थाने मुबंईत तो गेला. तिथूनच २०११ त्याची अग्निपरीक्षा सुरू झाली . प्रसिद्ध दिग्दर्शक व सेनेफोटोग्राफर, कॅमेरामन लक्ष्मण उतेकर यांनी ‘टपाल’ चित्रपटातील बालकलाकाराला प्रशिक्षित करावयाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish pathode of chandrapur teach language and acting lessons to artists in tanaji zws
First published on: 21-01-2020 at 00:26 IST