News Flash

स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम’; कृषि विधेयकावरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपानं ठेवलं बोट

"गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!"

संग्रहित

केंद्र सरकार कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. एक विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून, राज्यसभेत पारित व्हायचं आहे. मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून भाजपानं चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपानं टीका केली आहे. “महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम!”, असं म्हणत भाजपानं निशाणा साधला आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली जाणार आहेत. मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं भाजपानं प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.

मोदी सरकारनं कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. लोकसभेत तिन्ही विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर दोन विधेयके रविवारी राज्यसभेत मांडण्यात आली. यावेळी लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग केला. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सोशल माध्यमांवरही ही चर्चा रंगलेली असतानाच भाजपानं निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 10:23 am

Web Title: ashish shalar bjp shivsena sanjay raut agriculture bills agriculture ordinances bmh 90
Next Stories
1 “बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते”
2 रायगड जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात घट
3 कांदा निर्यातबंदीचा पाच हजार कोटींना फटका?
Just Now!
X