News Flash

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचं टीकास्त्र

महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु असल्याचीही केली टीका

संग्रहित

मराठा आरक्षणाच्या प्रकरणी सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकारने राज्यपालांना आरक्षणाच्या प्रश्नाबाबत निवेदन दिलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांचं टीकाकारण सुरुच आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी आता सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणातले महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोच चव्हाण यांनी आरक्षणाचं जाऊद्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचं भाषांतर करण्यात आलं नाही आणि त्यामुळे या अहवालातले प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 11:39 am

Web Title: ashish shelar critizes government on maratha reservation vsk 98
Next Stories
1 केंद्रानं लसीकरणाचं ओझं टाकलं राज्यांच्या खांद्यावर, ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा सवाल
2 डॉ. सलील कुलकर्णी उलगडणार भावसंगीताची परंपरा; YouTube वर Live
3 सामना वाचत नसल्याच्या नाना पटोलेंच्या टीकेला शिवसेनेने दिलं उत्तर; म्हणाले…
Just Now!
X