‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद उपक्रमाच्या पाचव्या भागात आज मंगळवारी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता या वेबसंवादाला सुरुवात होईल. वाचकांना  http://tiny.cc/Loksatta-Maharashtra60 या लिंकवर नावनोंदणी करून या वेबसंवादात सहभागी होता येईल आणि चव्हाण यांना प्रश्नही विचारता येतील. साठीचा गझल‘ या उपक्रमाद्वारे माजी तसेच विद्यमान मुख्यमंत्री राज्याच्या साठ वर्षांतील प्रगती आणि भविष्यातील आव्हानांचा वेध घेणार आहेत. वाचकांना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

सहभागी होण्यासाठी..

झूम अ‍ॅपच्या माध्यमातून वाचकांना या वेबसंवादात सहभागी होता येईल. या नेत्यांना प्रश्न विचारण्यासाठी  http://tiny.cc/Loksatta-Maharashtra60 या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हायचे आहे. या लिंकवर नोंदणी केल्यावर तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. या संदेशात देण्यात येणाऱ्या लिंकवर क्लिक करून सहभाग घ्यायचा आहे.

प्रायोजक..

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन’ (एमआयडीसी) आहे. उपक्रमाचे सहसंयोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हिरानंदानी ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी लि. आहे. तर कार्यक्रम पॉवर्डबाय दामजी शामजी शहा ग्रुप आहे.