News Flash

“मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा केवळ दिखावा”, अशोक चव्हाणांची टीका

सचिन सावंत यांच्या ट्विटवर चव्हाणांची प्रतिक्रिया

संग्रहीत

मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची भूमिका केवळ दिखावा असून त्यांना केवळ राजकारण करायचं आहे अशा शब्दात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आणल्याचंही ते म्हणाले.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा दिखाऊ असून या मुद्द्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचं आहे, हे स्पष्ट आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपावर निशाणा साधत सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले, “एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे‌? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे.”


हेही वाचा- “महाराष्ट्रात ५ जून नंतर करोनाचा भडका उडाला तर सुपरस्प्रेडर भाजपा जबाबदार असेल!”

तसेच “मराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे २०१९/२० करण्यात आली का? या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत.” असं देखील सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.


“कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांनी व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू.” असं सचिन सावंत यांनी काल ट्विटद्वारे म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 3:44 pm

Web Title: ashok chavan slams bjp for its stand for maratha reservation vsk 98
Next Stories
1 ‘माझ्या नशीबामुळे पेट्रोलचे दर कमी झाले तर जनतेसाठी चांगलं…’ मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल
2 पहिले पत्र बार मालकांसाठी, तर दुसरे…; भाजपाने शरद पवारांना केले तीन सवाल
3 “महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल”; पदोन्नती आरक्षणावरुन नितीन राऊतांचे सुतोवाच
Just Now!
X