सोलापूर जिल्हा शिवसेना युवा सेना उपप्रमुख महेश सुभाष देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सोनसाखळी व पैसे हिसकावून घेतले आणि त्यांना अंगावरील कपडे काढून सोडून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील व त्यांचे बंधू अजिंक्यराणा पाटील यांच्यासह आठजणांविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा चव्हाटय़ावर येऊन तणाव निर्माण झाला आहे.
बाळराजे पाटील हे मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचे पुत्र आहेत. शिवसेनेचे युवा सेना जिल्हा उपप्रमुख महेश देशमुख (२६, रा. मोहोळ) हे आपले मित्र शिवरत्न श्रीपती साठे यांच्यासह कुर्डूवाडी येथी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून मोहोळकडे परत निघाले असता वाटेत माढा तालुक्यातील अंजनगाव ते लोंढेवाडी दरम्यान माळरानावर दोन मोटारसायकलस्वारांनी देशमुख यांची गाडी अडविली. त्यापाठोपाठ जीपमधून आलेल्या सात-आठजणांनी उतरून देशमुख यांना      गाडीतून बाहेर खेचले. त्यांना हॉकी स्टिक व लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. त्यांचे मित्र शिवरत्न साठे यांच्यावरही हल्ला     करण्यात आला. त्यांच्या ताब्यातून एक तोळ्याची सोनसाखळी व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेऊन देशमुख यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून घेतले. नग्नावस्थेत त्यांना सोडून देण्यात आले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने देशमुख व साठे यांना सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ मोहोळ येथे संतप्त शिवसैनिकांनी एकत्र येऊन ‘बंद’पुकारला. तर इकडे गुन्हा घडल्याच्या हद्दीचा वाद उपस्थित झाल्याने पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर झाला. अखेर माढा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद झाली असून फिर्यादीनुसार विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील, त्यांचे बंधू अजिंक्यराणा पाटील यांच्यासह राजेंद्र भगीरथ गुंड, शेखर बाळासाहेब साळुंखे, मधुकर माळी, विजय देवकते, अमोल डोंगरे व नाना खरात (सर्व रा. अनगर, ता. मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे मोहोळ परिसरातील राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेनेचा संघर्ष पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. सात वर्षांपूर्वी मोहोळ येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंडित देशमुख यांचा निर्घृण खून झाला होता. यात बाळराजे पाटील हे प्रमुख आरोपी होते. त्यावेळी मोहोळ येथे प्रचंड दंगल होऊन संतप्त जमावाने जाळपोळ केली होती. यात मोहोळ पोलीस ठाण्यासही आग लावण्यात आली होती.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
atul londhe
 ‘नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा’; पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणुक आयोगाला पत्र
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके