13 August 2020

News Flash

जुन्या-नव्या शिवसैनिकांनी एकत्र यावे – दिवाकर रावते

शिवशाहीचे मोठय़ा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भगव्या ध्वजाखाली जुन्या जाणत्या व नवोदित शिवसैनिकांनी हातात हात घालून एकत्र येण्याचे आवाहन शिवसेनानेते, आमदार दिवाकर रावते म्हणाले यांनी

| July 13, 2014 02:30 am

शिवशाहीचे मोठय़ा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भगव्या ध्वजाखाली जुन्या जाणत्या व नवोदित शिवसैनिकांनी हातात हात घालून एकत्र येण्याचे आवाहन शिवसेनानेते, आमदार दिवाकर रावते म्हणाले यांनी केले.
येथील पाटणकॉलनीत १९८५ मध्ये सर्वप्रथम सुरू झालेल्या कराडमधील शिवसेना शाखा क्रमांक १ च्या नामफलकाचे अनावरण आमदार रावते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, नितीन काशिद, शशिराज करपे, रामभाऊ रैनाक, शशिकांत हापसे, प्रमोद तोडकर यांची या वेळी उपस्थिती होती. प्रारंभी दिवाकर रावते यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले. शाखाप्रमुखपदी विलास मोहिते व उपशाखाप्रमुख म्हणून विशाल माने यांची निवड करण्यात आली.
रावते म्हणाले, की सातारा जिल्ह्यात शिवसेना स्थापन करण्याचा मान कराड शहरास मिळाला स्वत: शिवसेनाप्रमुखांनी या शाखेस शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा व स्फूर्ती घेऊन शिवसनिकांनी शहर व तालुक्यात झंझावात निर्माण केला होता. आज मी जुन्या शिवसैनिकांना आवाहन करतो, की त्यांनी नव्या दमाच्या शिवसैनिकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावत निर्माण करावा, येणारी सत्ता शिवशाहीचीच असेल.
हर्षद कदम म्हणाले, की शहरातील जुने व युवा सैनिक यांच्यात समन्वय साधून शहरात शाखा उभारणीस प्राधान्य देऊन पक्षसंघटना बळकट करू. नितीन काशीद, सतीश तावरे, संजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शशिराज करपे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 2:30 am

Web Title: assemble to old new shivsainik divakar ravte
टॅग Karad
Next Stories
1 मनसे इच्छुकांच्या उद्या मुलाखती
2 कापडबाजारातील धाडसी चोऱ्या; पोलिसांकडून टोळी निष्पन्न, एकाला अटक
3 काँग्रेसकडून दलित, सर्वसामान्यांना संधी- राजू
Just Now!
X