29 October 2020

News Flash

राज्यातील मेगा नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण: मुख्यमंत्री

विधान परिषदेत गुरुवारी आमदार विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत गुरुवारी आमदार विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या मेगा नोकर भरतीमध्ये मराठा समाजासाठी १६ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय सध्या हायकोर्टाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे निकालानंतरच हा बॅकलॉग भरला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी परळीत ३० तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. आंदोलनाचा वणवा पेटण्याआधी सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

सरकार लवकरच ७० हजार जागांची भरती करणार आहे. आरक्षण नसेल तर या जागांच्या भरतीमध्ये आम्हाला स्थान मिळणार नाही अशी भीती मराठा समाजातील तरुणांमध्ये पसरली आहे, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 3:36 pm

Web Title: assembly monsoon session 2018 16 percent reservation for maratha in 72000 government jobs
Next Stories
1 शिवनेरी बस बंद पडल्याने मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी
2 नागपूर विधानभवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न
3 मुंबई : डोळ्यांदेखत बॅग गायब करणाऱ्या ‘जादूगार’ गँगला पोलिसांनी केली अटक
Just Now!
X