News Flash

महिलेशी असभ्य वर्तन : फिनले मिलच्या सहायक व्यवस्थापकाला अटक

सहायक व्यवस्थापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल के ला असून बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

अमरावती : परतवाडा येथील फिनले मिलमध्ये कार्यरत महिलेसोबत पाच वर्षांपासून असभ्य वर्तन करण्याच्या आरोपात अचलपूर पोलिसांनी तेथील सहायक व्यवस्थापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल के ला असून बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.

नरेंद्र कुमार संतराज शर्मा (३७, रा. गंगसरी, रायबरेली, उत्तर प्रदेश, ह.मु. देवमाळी, परतवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फिनले मिलमध्ये सहायक व्यवस्थापक (स्पिनिंग विभाग) या पदावर कार्यरत आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३५४ अ, ३५४ डी अन्वये अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे.

संबंधित आरोपीकडून होणाऱ्या असभ्य व अश्लील हावभावासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण सांगितले. मात्र, त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता, फिनले मिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात महिला सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल आढे व कर्मचारी करीत आहेत.

फिनले मिलमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील व असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी काही वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्यानंतर चौकशीअंती दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हे प्रकरण उघडकीस आल्याने मिल वादग्रस्त ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:01 am

Web Title: assistant manager of finlay mill arrested for indecent behavior with the woman zws 70
Next Stories
1 मध्यवस्तीत असलेले कोविड केंद्र शहराबाहेर हलवण्याची मागणी
2 महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांकडून उपचार
3 बालविवाह रोखला
Just Now!
X