सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक फौजदार शिवाजी महादेव सोलवनकर (५६) यांचे रस्ते अपघातात निधन झाले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून ते काम पाहत होते. सोनवलकर हे खासगी कामानिमित्त आपल्या मुलासह मोटारसायकलवर बसून सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावरून जात असताना त्यांना समोरून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला.