आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत सोमवारी नाशिकमध्ये विवाहबद्ध झाली. महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या महेश तुंगार यांच्याशी कविताचा विवाह झाला.
विवाह समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना कविताने लग्नाचा करिअर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे सांगितले. पुढील काळातही आपण धावपटू म्हणून विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार असल्याचे तिने स्पष्ट केले. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आपले स्वप्न असल्याचेही कविताने सांगितले. कविताच्या विवाहाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
(संग्रहित छायाचित्र)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 2:01 am