23 February 2019

News Flash

जाणून घ्या राज्यात हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या कारवाया

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.

मालेगावमध्ये २००६ मध्ये मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता.

राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातून हिंदुत्ववादी अतिरेक्याला अटक केली आहे. पुण्यातूनही दोन संशयितांना अटक करण्यात आली असून या तिघांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांची चौकशीही करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या वैभव राऊत (वय ४०) या तरुणाच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आले. राज्यात यापूर्वीही हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाया केल्या आहेत. या कारवायांचा घेतलेला हा आढावा…

* २९ सप्टेंबर २००८ : मालेगाव येथे बॉम्बस्फोट. यात हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहितसह ११ आरोपींना अटक. त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी का, हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. अखेर दहशतवादविरोधी कायद्यानुसार खटला चालविण्याचे आदेश. सध्या या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरू. साध्वी, पुरोहित यांच्यासह बहुतांश सर्वच आरोपी जामीनावर.

* ४ जून २००८ : ठाण्याच्या गडकरी रंगायतन तर त्याआधी ३१ मे रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट. ठाण्याच्या स्फोटात सातजण जखमी झाले. या प्रकरणी एटीएसकडून रमेश गडकरी, विक्रम भावे यांच्यासह सहा जणांना अटक. हे सर्व सनातन संस्थेचे असल्याचा आरोप होता. मात्र न्यायालयाने आरोपी सनातन संस्थेचे साधक किंवा अन्य कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते नाहीत असा निर्वाळा दिला. गडकरी, भावे यांना दहा वर्षांची शिक्षा तर उर्वरित चौघांची निर्दोष मुक्तता.

* १६ ऑक्टोबर २००९ : ऐन दिवाळीत मडगाव येथे स्फोट. एके ठिकाणी बॉम्ब वाहून नेत असताना रस्त्यातच त्याचा स्फोट होऊन सनातन संस्थेचे साधक मलगोंडा पाटील, योगेश नाईक यांचा मृत्यू ओढवला. या दोघांसह एकूण ११ जणांविरोधात एनआयएने आरोप ठेवले. सहा जणांना अटक. रूद्र पाटीलसह तिघे फरारी होते. विशेष न्यायालयाने मात्र पुराव्यांअभावी अटकेत असलेल्या सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

First Published on August 11, 2018 4:47 am

Web Title: ats raids in nalasopara maharashtra history of hindu right wing organisation acts