25 September 2020

News Flash

यवतमाळमधील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; युवा सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक

यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

काश्मिरी विद्यार्थ्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा कांगावा करत यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी युवा सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी अटक केली आहे. युवासेना पदाधिकारी अजिंक्य मोटके व इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्याने हल्ला केला होता. यात ४१ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार घडत होते. हे लोण यवतमाळमध्ये पोहोचले होते. वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री १० ते १५ तरुणांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ हे नारे म्हणण्याची सक्ती केली. उमर नजीर, उमर रशीद, तजीमुल्ला अली, ओवस मुस्ताक, आमीर मुलाद अशी मारहाण झालेल्या काश्मिरी युवकांची नावे होती. याप्रकरणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर पोलिसांनी या प्रकरणी युवा सेनेशी संबंधित तीन जणांना अटक केली आहे. युवासेना पदाधिकारी अजिंक्य मोटके आणि त्याच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवा सेनेचा दहशतवादालाविरोधात निष्पाप काश्मिरी नागरिकांना आमचा विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 5:19 pm

Web Title: attack on kashmir student yavatmal police arrest 3 party workers of yuva sena
Next Stories
1 चीनच्या २९ अब्ज डॉलर्सच्या बांबू उद्योगाला आव्हान देण्याची भारताकडे क्षमता
2 भंडाऱ्यात पालकमंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
3 पाकिस्तानमें इंदिराजीके समयवाला सन्नाटा चाहिये- भुजबळ
Just Now!
X