समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर लिहिली होती. या रागातून मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.