भाकपचे ज्येष्ठ नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांना पत्ता विचारून मग हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी पानसरे दाम्पत्यावर कोल्हापुरात हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावर गोळ्याही झाडण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलीस करीत असून, अद्याप हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या नव्या माहितीमुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे.
हा परिवर्तनाच्या चळवळीवरील हल्ला
गोविंद आणि उमा पानसरे या दोघांची प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे ‘अॅस्टर आधार’ या खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले. गोविंद पानसरे यांच्यावर अजूनही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पानसरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या शरीरातील तीन गोळय़ा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
पानसरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात मोर्चा
दरम्यान, पानसरे यांना गेल्या काही महिन्यांपासूनच धमक्यांची पत्रे येत असल्याची माहिती पुढे आली आहे. याची माहिती त्यांची सून मेघा पानसरे यांनी कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलताना दिली. ‘तुमचा दाभोलकर करू’ असा आशय असलेल्या या पत्रावर पुणे पोस्टाचा शिक्का असल्याचेही या वेळी त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. पण या पत्राची दखल पानसरे यांनी घेतली नव्हती. पोलिसांनी या सर्व शक्यता गृहीत धरून हल्ल्याचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
पानसरे यांना धमक्यांची पत्रे