News Flash

शेतकरी भाऊ-बहिणीचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतजमिनीच्या सव्‍‌र्हे क्र मांकामध्ये जाणीवपूर्वक चूक करण्यात आल्याचा आरोप

प्रतिनिधिक छायाचित्र

शेतजमिनीच्या सव्‍‌र्हे क्र मांकामध्ये जाणीवपूर्वक चूक करण्यात आल्याचा आरोप

अमरावती : यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस तालुक्यातील कळगाव येथील भाऊ-बहिणीने येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न के ला. पोलिसांनी समयसूचकता दाखवून या दोघांना लगेच ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यांच्या शेतजमिनीच्या सव्‍‌र्हे क्र मांकामध्ये जाणीवपूर्वक चूक करण्यात आल्याचा या शेतकरी भाऊ-बहिणीचा आरोप आहे.

कळगाव येथील नितेश जवादे आणि त्यांची बहीण कल्पना जवादे विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले होते. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न के ला, पण पोलिसांना पाहून ते तिथून निघाले. जवळच्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयासमोर दोघे पोहचले होते, तेव्हा तत्परता दाखवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यापूर्वी दोघांनी गेल्या १० जूनला जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सोपवून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

दोघांचाही शेती व्यवसाय आहे. वारसा हक्काने मिळालेली शेती ते कसतात. १९७२ पासून संबंधित जमिनीवर त्यांचे वडील शेती करीत आहेत. त्याआधी ती सरकारी जमीन होती. पण, सरकारने १९७८ मध्ये जमीन नियमानुकू ल करून जमिनीचा पट्टा त्यांचे वडील आणि आजी यांच्या नावे के ला होता. या शेतजमिनीच्या शेत सव्‍‌र्हे क्र मांकाची नोंद करताना जाणीवपूर्वक चूक करण्यात आली. यासंदर्भात नितेश यांच्या वडिलांनी १९८५ मध्ये तक्रोर करून चूक दुरुस्त करण्याची मागणी के ली. तेव्हापासून काहीच कार्यवाही करण्यात आली नाही, असे नितेश आणि कल्पना जवादे यांचे म्हणणे आहे.

गावातील काही लोकांनी वनहक्काच्या माध्यमातून जमिनीवर दावा के ला. त्यानंतर आमची शेतजमीन वनविभागाने ताब्यात घेतली. जमीन नियमानुकू ल के लेली असताना देखील आम्हाला वंचित ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात जमिनीसंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाहीस स्थगिती देण्याचा आदेश पुसद येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. तरीही नायब तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने बळजबरीने शेतजमीन ताब्यात घेतली आणि पिकांचे नुकसान के ले, असे नितेश जवादे यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 1:58 am

Web Title: attempt of self immolation of farmer brothers and sisters in yavatmal district zws 70
Next Stories
1 एटीएममधून पैसे चोरणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गोळीबार!
2 राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व पुरवठादार योगेश मालपाणीला अटक
3 गोळीबारात ग्रामपंचायत सदस्य जखमी
Just Now!
X