18 February 2020

News Flash

अश्लील चाळे करून बलात्काराचा प्रयत्न ; अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न

तिचे कपडे ब्लेडने फाडले, तिला बळजबरीने औषध पाजले, तिच्या तोंडात पायातील चाळ घातली

(संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर : घुग्घुस येथील एका गरीब कुटुंबातील १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने दोघांनी घरात प्रवेश केला.तिचे कपडे ब्लेडने फाडले, तिला बळजबरीने औषध पाजले, तिच्या तोंडात पायातील चाळ घातली. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे करीत बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे पाय बांधून गळ्यात गळफास लटकवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ती मरण पावली, असे समजून दोघांनी पळ काढला. सदर प्रकरण घुग्घुस पोलिसांकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे चंद्रपूर शहर पोलिसांकडे वळते करावे व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

घुग्घुस परिसरात मुलगी आणि आईवडील राहतात. आईवडील मोलमजुरीकरिता बाहेर गेले असल्याने ती मुलगी एकटी घरी होती. आईवडील घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार लक्षात आला. तिला तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले. हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती येथील शहर अध्यक्ष राजुरेड्डी व  कामगार नेते सय्यद अनवर यांना माहिती मिळताच शासकीय रुग्णालय गाठून पीडित मुलीची व आईवडिलांची भेट घेऊन घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री वडेट्टीवार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधले आणि घुग्घुस पोलिसांवर अविश्वास दर्शवून घटनेचा तपास चंद्रपूर शहर पोलिसांकडून करण्याची मागणी केली. त्या मागणीनुसार घटनेची चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्याकडे तपास सोपवला आहे. गंभीर प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करून आरोपीला अटक करून कडक कारवाई करावी, अशी  मागणी करण्यात आली आहे.

First Published on January 28, 2020 3:29 am

Web Title: attempt to kill a minor girl after molestation zws 70
Next Stories
1 सांगलीतील ९३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ – जयंत पाटील
2 सैन्य भरतीच्या आमिषाने १२ तरुणांची फसवणूक
3 वाडय़ातील दास्तान डेपोवरील छापा बोगस
Just Now!
X